प्रियकराने गर्लफ्रेंडसोबत केलं धक्कादायक कृत्य
(crime news) एका प्रियकराने आपल्या 65 वर्षीची प्रेयसीची काठीने मारून हत्या (Man Killed his Live in Partner) केल्याची धक्क्दायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने 45 वर्षीय प्रियकर भडकला. महिलेच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. काही वेळातच पोलिसांनी त्याला अटक केली. दोघांच्याही पती आणि पत्नीचा आधीच मृत्यू झालेला होता. यामुळे एकटेपणा दूर करण्यासाठी दोघंही एकमेकांच्या जवळ आले आणि शेतातच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relation) राहू लागले. ही घटना मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातीलल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलिसांनी माहिती मिळाली की बनी गावातील बसंतीलाल मोगीया याने आपल्या सोबत राहणाऱ्या कमलाबाईची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बसंतीलालचं वय 45 वर्ष तर त्याची मृत प्रेयसी कमलाबाईचं वय 65 वर्ष होतं.
दोघंही शेतात असलेल्या घरात 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघांमध्ये सतत काही ना काही कारणावरुन वाद होत असे. मंगळवारी रात्रीही दोघांचं भांडण झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपलच्या घरी दोन दिवसांपासून जेवण बनलेलं नव्हतं. याच कारणामुळे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला.
आरोपीने कमलाबाईला जेवण बनवण्यास सांगितलं असता, तिने यासाठी नकार दिला. यामुळे भडकलेल्या बसंतीलालने तिला काठीने मारण्यास सुरुवात केली. यानंतर कमलाबाई बेशुद्ध झाली असता आरोपी तिला याच अवस्थेत सोडून तिथून फरार झाला. सकाळी दोघंही घरातून बाहेर न आल्याने शेजारचे लोक आतमध्ये गेले. इथे त्यांना कमला मृतावस्थेत पडलेली आढळली. लोकांनी लगेचच पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी बंसीलालला अटक केली आहे.