जयसिंगपूर पोलिस ठाणे यांची धडाकेबाज कारवाई एकावर चोरीचा गुन्हा दाखल
जयसिंगपूर/प्रतिनिधी – रोहित जाधव
मा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस (police) ठाणे गुन्हे शोध पथकातील कडील सहाय्यक फौजदार तानाजी गुरव, पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे,पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे जयसिंगपूर पोलीस (police) ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीद्वारे रेल्वे स्टेशन तिकीट ऑफीस समोर पार्किंग मध्ये एक इसम संशयित रित्या वावरत असल्याची माहिती मिळाली.
सदर इसम लाल निळ्या रंगाच्या तीन मोटर सायकल जवळ थांबलेला मिळून मिळून आला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन सदर मोटारसायकल बाबत चौकशी केली असता आणि त्याने समाधानकारक माहिती न सांगता उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्या वेळी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरच्या मोटार सायकली पैकी एक डिस्कवर मोटर सायकल रुग्णवाल टॉवर पार्किंग,गल्ली नंबर 9 जयसिंगपूर (police) येथून व दुसरी मोटारसायकल दीड वर्षापूर्वी पायोस हॉस्पिटल जयसिंगपूर, तसेच एक मोटारसायकल गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले.
कुमार तानाजी खैरे वय वर्ष 37 राहणार विठ्ठल मंदिर शेजारी तासगाव, जिल्हा. सांगली या इसमावर जयसिंगपूर पोलीस ठाणे
गु.र.नं 5/2022 भा.द. वि.स कलम 379 प्रमाणे मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित इसम कुमार तानाजी खैरे वय वर्ष 37 राहणार विठ्ठल मंदिर शेजारी तासगाव,जिल्हा.सांगली यांचेकडून
1)25000/- रुपये किमतीची बजाज कंपनीची डिस्कवर मोटर सायकल
2)25000/- रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर
3)15000/-रुपये हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल
असा एकूण 65000/-रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस (police) अधिकारी जयसिंगपूर श्री वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोसई वाघ,पोसई पाटील, परि.म.पोसई टकले, सहाय्यक फौजदार तानाजी गुरव, सहाय्यक फौजदार सोमनाथ चुळचुक, पोलीस नाईक बाबाचांद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे, चालक सहाय्यक फौजदार संजय देशमुख यांनी केली आहे