विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद द्यावा – लोकनियुक्त सरपंच विजय माळी

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर काळजी घेत आहे.त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.ही लस प्रभावी असून विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणास प्रतिसाद द्यावा असे आवाहन रेंदाळ गावाचे लोकनियुक्त सरपंच विजय माळी यांनी केले.ते हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रेंदाळ उपकेंद्र यांच्या मार्फत रेंदाळ येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वय १५ ते वय १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची लसीकरण मोहिम राबविण्यात आली.या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुका पंचायत समितीच्या सदस्या संगिता पाटील ह्या होत्या.
लोकनियुक्त सरपंच विजय माळी पुढे म्हणाले , सध्या कोरोनाने पुन्हा मान वर काढली आहे.कोरोनाबरोबरच ओमायक्रोन या विषाणूने अनेक देशात धूमाकूळ घातला आहे या पार्श्वभूमीवर सर्वानीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोना प्रतिबंधक लसीमुळे या रोगावर आपण निश्चितपणे मात करू शकतो.यासाठी स्वतः चे मनोबल ही वाढविले पाहिजे असे मत व्यक्त केले.
१५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविन रजिस्ट्रेशन पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांना काही आजार नसल्याची खात्री करण्यात आली व पूर्ण काळजी घेऊन विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.इयत्ता ९ वी ते १२ वीच्या वय वर्षे १५ पूर्ण झालेल्या ४६० विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले.
यावेळी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वसुंधरा देशमुख शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.गंगापूरे ,रेंदाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रकाश गिरी ,हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुराळे मँडम , आरोग्य सेविका सीमा बडेकर , आरोग्यसेविका राजश्री सलगर ,पोपट पाटील , शामराव पाटील आदिसह शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी , आशा सेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *