भाजप अलर्ट मोडवर; विरोधकांना देणार झटका

(political news) उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाजपला एकच झटका बसला. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ भाजपचे तिंदवारी येथील आमदार बृजेश प्रजापती, बिल्होर येथील आमदार भगवती सागर आणि तिलहर येथील आमदार रोशन लाल वर्मा यांनी सुद्धा भाजपला रामराम केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये एक राजकीय भूकंप आलं असून भाजप आता अलर्ट मोडवर आहे. तसेच उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका देत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.

विरोधकांना देणार जोरदार झटका

सूत्रांनी दिलल्या माहितीनुसार, आता गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उत्तरप्रदेशातील स्थिती हाताळण्याची जबाबदारी आपल्या स्वत:च्या हातात घेतली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांना कुठल्याही प्रकारे रोखाचे आणि समाजवादी पक्षाला लवकरच एक मोठा धक्का द्यायचा अशी पक्षाची रणनिती आहे. समाजवादी पक्षातील एक मोठा चेहरा लवकरच आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत भाजप असल्याचं वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यासोबतच इतरही सहयोगिंना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील आपले मित्र पक्षांसोबत संपर्क कायम ठेवून त्यांना योग्य त्या जागा देण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय जनता पक्षातून केवळ स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्याने नाही तर अर्धा डझनहून अदिक आमदारांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान, राज्यमंत्री धरम सिंह सैनि, आमदार ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य, एमएलसी देवेंद्र प्रताप सिंह हे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. (political news)

कोअर कमिटीची 10 तास खलबतं

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर भाजपच्या कोअर कमिटीची 10 तास बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशातील सहा क्षेत्रांचा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्तवाची चर्चा झाली आहे.

13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत – शरद पवार

आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे आता हे 13 आमदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि आणखी काही सहयोगी त्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे. तुम्ही पाहाल येत्या काळात दररोज एक-एक नवा चेहरा भाजपतून बाहेर पडेल आणि इकडे येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *