जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी : चंद्रकांत पाटील

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका होत्या. भाजपला जागा मिळाली नाही म्हणून चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे भजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची कोअर कमिटी आहे. जयश्री जाधव भाजपच्या नगरसेविका होत्या. चंद्रकांत जाधव यांचे बंधू हे देखील भाजपचे नगरसेवक होते. एकाच घरात भाजपचे दोन नगरसेवक आणि भाजपला जागा न मिळाल्?याने चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढविली. पहिल्यापासून चंद्रकांत जाधव हे भाजप व आरएसएसशी निगडित होते. त्यामुळे जयश्री जाधव यांची येत्या दोन दिवसांत भेट घेऊन त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा आग्रह करणार आहे. त्यांनी जर आमचा प्रस्ताव नाकारून काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार, असे सांगितले तर पोटनिवडणूक लढविण्याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल.महाराष्ट्रातील निर्बंध केंद्र सरकारने घातले, या ना. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर पाटील म्हणाले, मुश्रीफांचे ज्ञान कागलच्या बाहेर नाही. महाराष्ट्राइतके कठोर निर्बंध अन्य राज्यांत नाहीत. हे निर्बंध केंद्र सरकारने घातलेले नाहीत. एकीकडे मुंबईचे महापालिका आयुक्त म्हणतात की, कोरोना संपण्याच्या दिशेने चालला आहे. दोन डोस घेतलेल्यांसाठी तो घातक नाही. हॉस्पिटलमधील रुग्णसंख्याही कमी आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आवश्यकता नाही. त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रीची संचार बंदी लागू करतात. यामुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *