आरंभ फाउंडेशनकडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सेवा संकल्प दिन साजरा

आरंभ फाउंडेशनने सैनिक टाकळी (कोल्हापूर) येथे
स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांना , मावळ्यांना, जनतेला दाखवले आणि ते सत्यातही आणले त्या राजमाता जिजाऊ तसेच युवकांनो उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होई पर्यंत थांबू नका सांगणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन जवान संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा, पर्यावरण प्रेमी वैष्णवी पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करत पूरग्रस्तांसाठीचे मदत कार्य ,देशी झाडांचे वाटप, कोरोना योद्यांचा, जवानांचा सत्कार, बीज संकलन असे अनेक सामाजिक पर्यावरण संवर्धनाचे कार्य सदस्यांनी केले त्याचे कौतुक करत ही सेवा जिजाऊच्या चरणी समर्पित करून स्वतःला कधीही कमी न लेखत सतत आपल्या परीने शक्य तितकी समाज सेवा करत राहू असे सांगितले.
“मी सेवाव्रती “म्हणून सर्वांनी संकल्प घेतला. जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले.
या वेळेस नम्रता गायकवाड, निकिता गायकवाड, कृष्णात पाटील ,श्रावणी पाटील, नरेंद्र गायकवाड, सई गायकवाड, अर्चीता गायकवाड, सिद्धेश गायकवाड, संदीप पाटील, आर्यन गायकवाड, साक्षी गायकवाड, आदित्य पाटील, खंडागळे,शौर्य पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *