यापुढे माझ्या मुलांचे फोटो पोस्ट करणार नाही’;

सेलिब्रिटी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यामुळे इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं टाळलं आहे. त्यातच आता अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा (Aayush Sharma) याने त्याच्या मुलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुषने यापुढे त्याच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी आयुष आणि त्याची पत्नी अर्पिताने अनेकदा सोशल मीडियावर मुलांसोबतचे फोटो पोस्ट केले होते. मात्र त्यावरील नकारात्मक कमेंट्स वाचून दोघांनी हा निर्णय घेतला आहे. अर्पिता आणि आयुष यांना अहिल हा मुलगा आणि आयात ही मुलगी आहे.’बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयुषने सांगितलं की त्याच्या मुलीच्या व्हिडीओवर अनेकांनी तिच्या दिसण्यावरून नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘जेव्हा माझी मुलं मोठी होतील आणि त्यांना वाटलं की आपण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करावेत, तेव्हा ते त्यांचा निर्णय घेण्यास मोकळे असतील. पण आता मी त्यांचे फोटो पोस्ट करणं बंद करणार आहे. ज्यावेळी त्यांना वाटेल की ते ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्सचा सामना करू शकतील तेव्हा ते त्याबाबत निर्णय घेतील. सध्याच्या घडीला असा काही निर्णय घेण्यास ते खूप लहान आहेत. त्यांचे फोटो आम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून एकप्रकारे ट्रोलर्सना निमंत्रणच देतोय. पालक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असं करू शकत नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये अशी माझी इच्छा आहे’, असं आयुषने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *