अभिनेता सलमान खानचा शेजाऱ्याविरोधात मानहानीचा खटला

अभिनेता सलमान खानने त्याच्या पनवेल फार्महाऊसच्या शेजार्‍याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad)  यांच्वि‍या रोधात त्याने हा खटला दाखल केलाय. केतन यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानची बदनामी केल्याचा आरोप सलमान याने केला आहे.

कक्कड यांनी एका यूट्यूबरला मुलाखत दिली. त्यावेळी सलमानची बदनामी होईल, असा आक्षेपार्ह बोलणं होतं, असा आरोप सलमानने केला आहे. या शोचा भाग असलेल्या इतर दोन लोकांवरही खटला दाखल करण्यात आलाय.

काही, युट्युब, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या साईटवरून सलमानविरुद्ध बदनामीकारक मजकूर दिलय. तो काढून टाकावा, अशी मागणी या खटल्यातून करण्यात आलीय.

सलमानचा पनवेल येथे फार्महाऊस आहे. तसेच केतन यांचंही पनवेल येथे सलमानच्या शेजारीच घर आहे. केतन यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यावर शुक्रवारी सिटी सिव्हिल कोर्टाने सलमानच्या पक्षात अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्तींनी केतन कक्कड यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी हाेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *