कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढली

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 369 रुग्णांची (corona cases) नव्याने भर पडली आहे. शुक्रवारी 68 जण कोरोनामुक्त झाले. कोल्हापूर शहरात 194 तर इचलकरंजीत 33 नागरिकांना संसर्ग झाला आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 993 अशी आहे. त्यापैकी 160 जण शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित 1 हजार 833 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत.

शहराबरोबर आजरा 6, भुदरगड 5, चंदगड 4, गडहिंग्लज 3, गगनबावडा 1, हातकणंगले 30, कागल 2, करवीर 17, पन्हाळा 5, राधानगरी 6, शाहूवाडी 24, शिरोळ तालुक्यात 11 तर नगरपालिका कार्यक्षेत्रात इचलकरंजी 33, जयसिंगपूर, मुरगूड, गडहिंग्लज प्रत्येकी 2, कागल 3, पेठवडगावात 1 बाधित रुग्ण (corona cases) सापडले. तसेच मुंबई 2, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सातारा, रायगड, धुळे, कर्नाटक येथील प्रत्येकी 1, सांगली, पुणे येथील प्रत्येकी 3 नागरिकांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

शासकीय प्रयोगशाळेत 1 हजार 58 नमुने तपासले. यामध्ये 179 बाधित रुग्ण आढळले. खासगी प्रयोगशाळांमध्ये 611 नमुने तपासले. यामध्ये 190 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *