सलमान रात्रीचा त्रास द्यायचा;आजही तसाच वागतो..अभिनेत्रीचा मोठा खुलासा

सलमान खानच्या(Salman Khan) शब्दाला बॉलीवूडमध्ये किती वजन आहे हे आतापर्यंत अनेक गोष्टींच्या माध्यमातून समोर आलंय. कितीतरी जणांना बॉलीवूडमध्ये मदतीचा हात देऊन तो त्यांचा गॉडफादर बनला आहे, तर ज्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवलाय त्यांच्या करिअरला त्यानं बॉलीवूडमधून उठवलं आहे हे वेगळं सागायला नकोच. विवेक ओबेरॉय हे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. सलमानविषयी अनेक गोष्टी नेहमीच कानावर येत असतात. म्हणजे मग ते त्याचं आतापर्यंतची प्रेमप्रकरणं असोत की अंडरवर्ल्डशी त्याचे संबंध असोत की अगदी त्याच्या हातून घडलेला अपघात,हत्या अशी कोणतीही मोठी प्रकरणं असोत….अर्थात यातनं तो सहीसलामत सुटला आहे हे सत्य आहे. आता त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक मदतीनं भारावलेले सर्वसामान्य खूप जास्त आहेत ज्यामुळे त्याच्या नकारात्मक गुणांवर सकारात्मकता भारी पडून जाते. असो आता त्याच्या बाबतीत आणखी एक अशी गोष्ट समोर आलीय ज्यामुळे बॉलीवूबडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही त्रास झाला होता. तिनं एका मुलाखतीतनं त्याविषयी नुकतच भाष्य केलं आहे.अभिनेत्री लारा दत्तानं(Lara Dutta) सलमानच्या एका त्रास देणाऱ्या सवयीविषयी नुकताच खुलासा केला आहे. तिने सांगितले की सलमानला मध्यरात्रीनंतर अगदीच तुम्ही गाढ झोपेत असाल तेव्हा फोन करायची सवय आहे. तो दिवसभरात कधीच फोन करायची तसदी घेणार नाही पण मध्यरात्र होऊन गेली की त्याचे कॉल येतात. आजही त्याची ही सवय बदलेली नाही. आता त्याचा फोन आल्यावर तो घेणं अपरिहार्य आहे असंही तिनं नमूद केलं. लारानं २००५ साली सलमानसोबत ‘नो एन्ट्री’ सिनेमात काम केले होते. आजही ती सलमानची खूप चांगली मैत्रिण आहे. त्यामुळे आजही तिचं बोलणं त्याच्यासोबतच होतं पण ते मध्यरात्रीनंतरच. लाराची ‘कौन बनेगी शिखरवती’ सिरीज नुकतीच भेटीला आली आहे. या सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्तानं लारान सलमानच्या मध्र्यरात्री फोन करून त्रास देण्याच्या सवयीविषयी भाष्य केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *