महाराष्ट्रात ‘भाजप १ नंबर’ चा पक्ष : चंद्रकांत पाटील

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत.या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्‍हणाले, २४ नगरपंचायतींमध्‍ये भाजाने एक हाती सत्ता मिळवली आहे. संघटनात्मक बांधणीचा भाजपला खूप मोठा फायदा झाला आहे. नगरपंचायतीच्या जिथे-जिथे निवडणूका झाल्या आहेत तिथे भाजपाने चांगल यश मिळवले आहे. भंडारा, गोंदिया नगरपंचायतीवरही भाजप एक नंबरवर असेल.

महाविकास आघाडीतील बेबनाव अनेक ठिकाणी समोर आले आहेत. महाराष्ट्रात लढायचे असेल तर सुटे सुटे लढा. एक-एकटे लढा. मग बघा कोणाची ताकद जास्त आहे. विचार आणि आचार एक नसताना तुम्ही एकत्र युती करून भारतीय पक्षाशी लढत असाल तर या एकत्र येण्याला सुध्दा आम्ही नजीकच्या काळात आम्ही विराेधी पक्षांना पूरून उरू. आतापर्यतच्या वेगवेगळ्या पातळीवर झालेल्या निवडणुकीत आम्ही स्‍वत:ला सिध्द केले आहे. आम्ही एक नंबर आहोत, असेही ते म्‍हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या गावोगावच्या नेत्यांचे, जे सदस्य निवडून आले आहेत त्यांचे ,कार्यकर्त्यांचे, भारतीय जनता पक्षाला मतदान करणार्‍या मतदारांचे अभिनंदन, असेही ते म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *