नांदणी या ठिकाणी घडली धक्कादायक घटना

(crime news) कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या शिरोळ (Shirol) तालुक्यातील नांदणी याठिकाणी एका 30 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Young man commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्न जुळत नसल्याने नैराश्य आल्याच्या कारणातून त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

अनुप आपगोंडा पाटील असं आत्महत्या करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून अनुप याचं लग्न जुळत नव्हतं. वयाची 30 वर्षे झाली असताना देखील आपलं लग्न जुळत नाही, म्हणून अनुपला नैराश्य आलं होतं.

यातूनच त्यानं आपल्या राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत लोखंडी अँगलला बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत मुलगा खाली न आल्याने पावणे अकराच्या सुमारास कुटुंबीयांनी अनुपच्या खोलीत जाऊन पाहणी केली. यावेळी अनुप घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनुपने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. (crime news)

या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *