कवठेगुलंद येथे १ कोटी ८३ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ

गणेशवाडी- प्रतिनिधी रोहित जाधव

आमदार आणि मंत्री पदाच्या कार्यकाळात दोन वर्षात जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा निधी शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी आणता आला येणाऱ्या तीन वर्षात याच वेगाने विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून शिरोळ विधानसभा मतदारसंघ राज्यात आदर्श विधानसभा मतदारसंघ बनवणार असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांनी काढले कवठेगुलंद येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते,विकासकामांना निधी किती मिळतोय या पेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या भौतिक गर्जा कोणत्या आहेत याची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने त्या पूर्ण केल्या पाहिजेत, आजकाल काहीजण गटातटाचे, मताचे राजकारण करतायेत परंतु या ठिकाणी जनतेला अपेक्षित भौतिक सुविधा आणि त्यांच्या गरजा प्रमाणेच विकासकामे होत आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही गेल्या दोन वर्षात विकास कामांना मिळणारा निधी राज्य सरकार कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे वळविला होता, परंतु पुढील तिन वर्षात तालुक्याच्या सर्वांगीण विकाससाठी 500 कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न असून तुम्ही कामे सुचवा मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांनी दिली.


कवठेगुलंद (ता.शिरोळ) गावाला डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, तसेच जिल्हा परिषद सदस्यां परविन दादेपाशा पटेल यांच्या फंडातून 70 लाख रुपये तर पंचायत समिती माजी सभापती, विद्यमान सदस्य मल्लाप्पा चौगुले यांच्या फंडातून आठ लाख रुपये असे एकूण एक कोटी ८३ लाख रुपयांच्या निधीच्या विकासकामांचा शुभारंभ, आणि लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. स्वागत प्रास्ताविकामध्ये अनिल पाटील यांनी नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांनी गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन गावात विकासाची गंगा आणली आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले तसेच जिल्हा परिषद सदस्य परविन पटेल व मल्लापा चौगुले यांनी दिलेल्या निधीबद्दल ही त्यांचे आभार मानले. माळ भाग कदम वस्ती ते दत्त मंदिर पर्यंत रस्ता करणे तसेच गावभागातील अंतर्गत रस्ते गटर्स व्हावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केले. यावेळी बोलताना नामदार यड्रावकर म्हणाले कवठेगुलंद सह या भागाचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य परविन पटेल, दादेपाशा पटेल व मल्लापा चौगुले यांनी अविरतपणे जनहिताची कामे करून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे येथे विकास काम खऱ्या अर्थाने दिसून आल्याने त्यांचे कौतुक करतो असे मत व्यक्त केले.

तदनंतर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर मल्लाप्पा चौगुले, दादेपाशा पटेल यांनीही विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.नामदार यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या परवीन पटेल , पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या एकूण 1 कोटी 83 लाख रुपयांमध्ये ग्रामपंचायत इमारत, दलित वस्ती रस्ते, पाणंद रस्ते मुरुमीकरण, सार्वजनिक शौचालय , गटर्स कामांचे उदघाटन, लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार, मलंगफकीर वस्तीजवळील गटार काम विविध पाणंद रस्ते यांचा शुभारंभ तर विद्यमान पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले यांच्या फंडातील पाण्याचा टँकर आदींचा लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला.

यावेळी सरपंच अश्विनी पाटील,उपसरपंच शशिकांत शिंदे, आनंदा कुम्मे, जयपाल कुंभोजे, आदिनाथ आरबाळे, कुमार जगताप, प्रकाश भेंडवडे, सदस्यां आयेशा मलंगफकीर, प्रमिला जगताप, संगीता शिंदे, परविन वाळवेकर, गुरुपाद केटगाळे, बाबगोंडा पाटील, बाबासो पाटील, राजेश डवरी, वासंती कांबळे, यांचेसह दिलीप भेंडवडे, रावसाहेब शिंदे, ग्रामसेवक एस. ए. जमादार, संदीप लाड, राजाराम रावण, माजी सरपंच चंद्रशेखर मगदूम, बाबालाल चिंचवाडकर, गौतम निंबाळकर, गौस वाळवेकर, अरुण पकाली, शाहिद पटेल, ऋषीराज शिंदे, यांचेसह ग्रामस्थ महिला आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन नादिरशहा मलंगफकिर यांनी केले आभार बाबगोंडा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *