घडली थरकाप उडवणारी भयंकर घटना

(crime news) औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर (Pundlik nagar) याठिकाणी थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शनिवारी रात्री याठिकाणी सात ते आठ जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर तलवारीने अनेक वार केले (deadly attack with sword) आहेत. यावेळी संबंधित तरुण जिवाच्या आकांताने ओरडत असताना देखील आरोपी त्याच्यावर तलवारीने वार करत राहिले. हा हल्ला इतका भयंकर होता की तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी ‘जखमी तरुणाच्या मदतीसाठी आलात तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही आरोपींनी स्थानिकांना दिली.

आरोपींच्या दहशतीमुळे कुणीही जखमी तरुणाच्या मदतीला सरसावलं नाही. शेवटी जखमी तरुणाच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याला स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तरुणाची झालेली अवस्था पाहून डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे. तरुणाच्या शरीरावर एवढ्या जखमा झाल्या होत्या की, त्याच्या डोक्याला तब्बल 70 टाके घ्यावे लागले. प्राणघातक हल्ल्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतर पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात (5 Accused arrested) घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शुभम विनायक मनगटे असं हल्ला झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री शुभमच्या दुकानावर आरोपी राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, शेख बादशाह, निलेश धस आणि अन्य दोन अज्ञात युवक आले होते. आरोपींनी दोन वेळा शुभमकडे गुटखा आणि तंबाखू मागितली. पण शुभमने याला नकार दिला. याच रागातून आरोपी टोळक्याने शुभमला घराच्या बाजूला असणाऱ्या रेणुकानगरातील मोकळ्या जागेत नेऊन मारहाण केली. (crime news)

यावेळी आरोपींनी शुभमच्या कपाळावर दगडाने मारहाण केली. तसेच पाठीवर चाकूने वार केले. आरोपी पठाडे यानं शुभमच्या डोक्यात तलवारीने वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. यावेळी तो जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्यामुळे आसपासचे लोक त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. पण ‘शुभमला कोण मदत करतो, त्यांना बघून घेतो’ अशी धमकी आरोपींनी दिली. त्यामुळे शुभमच्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. शेवटी शुभमच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *