पत्रकार राजगोंडा पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) गणेश वाडी येथे फेडरल बँकेच्या समोर पत्रकार श्री सतीश राजगोंडा पाटील यांना तीन तोळ्याचे गंठण सापडले त्यानंतर पत्रकार सतीश राजगोंडा पाटील यांनी ते गंठण तेथील जवळच्या फेडरल बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कडे सुपूर्द करून दिले.
हे गंठण शेडशाळ गावचे भाजपचे कार्यकर्ते श्री महावीर तकडे यांचे असल्याने त्यांना ते प्रामाणिकपणाने परत केल्याने श्री पत्रकार सतीश राजगोंडा पाटील यांचे सत्कार केले. राजगोंडा पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व ग्रामपंचायत, सरपंच ,सदस्य यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित गणेशवाडी गावचे सरपंच श्री प्रशांत अपिने,पोपट लोंढे, संदीप कांबळे, रोहित पोतदार, चंद्रकांत कोथळे ,चंद्रकांत अपिणे ,सुशांत बिरनाळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पत्रकार राजगोंडा पाटील यांचे प्रामाणिकपणाने गंठण सुपूर्द केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. (local news)
प्रतिनिधी:- विजय पाटील