सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

(crime news) फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. विश्वजित हणमंत पाटील (रा. इस्लामपूर) आणि त्याचा साथीदार सुरेश संजय पवार (रा. इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विश्वजित, सुरेश हे दोघे पीडित मुलीला आठ महिन्यांपासून त्रास देत होते. पीडित मुलगी शाळेत जात असताना दोघे तिचा पाठलाग करत. दोघांनी वेळोवेळी तिचा विनयभंग केला होता. सुरेश पवार याने मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढले होते. संशयित विश्वजित हा तिच्या घरी घुसून तिचा विनयभंग करीत होता.

काही दिवसांपूर्वी संशयित विश्वजित याने मुलीला “तुझे फोटो इतरांना दाखवेन”, अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. विश्वजित आणि सुरेश यांच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या घरच्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली. अत्याचार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *