पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नृसिंहवाडी येथील “मोफत दर्शन बस” सेवेचे केले उदघाटन
कोल्हापूर, दि. 20 : पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन यांच्या मार्फत नृसिंहवाडी ते खिद्रापूर “मोफत दर्शन बस सेवा” या उपक्रमाचे नारळ फोडून शुभारंभ केला. मंत्री महोदयांनी अध्यक्ष प्रसाद दुग्गे व फौंडेशन च्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अपर्णा मोरे, नृसिंहवाडी सरपंच पार्वती कुंभार,उपसरपंच रमेश मोरे,श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव पुजारी,सचिव संजय पुजारी यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी विशेष सहकार्य आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे लाभले. यावेळी अनेक देणगीदारानी चेक द्वारे फौंडेशन ला या उपक्रमासाठी देणगी ही दिली. ज्या लोकांनी या उपक्रमात सहकार्य केले त्या सर्व लोकांचे आभार अध्यक्ष प्रसाद दुग्गे यांनी केले.