खासगी कंपनीच्या कर्मचार्‍याला भरदिवसा १ लाख ५६ हजाराला लुटले

सातारा येथील पोवई नाक्याजवळ आज सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका खासगी कंपनीच्या कर्मचार्‍याला दोघांनी अडवून मारहाण केली. त्‍यांच्यानंतर त्‍याच्या जवळील 1 लाख 56 हजार रुपये लुटले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला.

पोलिसांच्या माहितीनुसार, लुटमारीत जखमी झालेला व्यक्ती एका खासगी कंपनीत काम करत आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी सिव्हील रोडवरील पोवई नाक्यावर आल्यानंतर त्यांना दोघांनी अडवले. आमच्या दुचाकीला कट का मारला, असे म्हणत यांच्यात वाद झाला. यावेळी दोघांनी त्यांच्याकडील असलेली कॅश ताब्यात घेतली व तेथून पळून गेले.
अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या घटनेनंतर त्‍यांने आरडाओरडा केला. परंतु संशयित तेथून पसार झाले. स्‍थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. सामारातध्ये भरदिवसा लुटमार करुन राेकड नेल्याने परिसर हादरुन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्‍यानुसार पोलिस संशयिताचा तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *