शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक

शिरोळ : प्रतिनिधी

(local news) श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व उद्यानपंडित गणपतपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशील व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत पिकावरील ड्रोनव्दारे औषध फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले, दत्त कारखान्यासमोरील चिंचवाड मार्गावरील ऊस पिकामध्ये सोमवारी ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

या कार्यक्रमासाठी व्ही.एस.आय. पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रीती देशमुख, वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ, डॉ. पी. पी. शिंदे, अ‍ॅग्री इंजि. डॉ. पी.व्ही. घोडके, अ‍ॅग्रोनॉमिस्ट उपस्थित होते. यावेळी राहूल मगदूम, आलगोंडा पाटील व अजिंक्य पाटील यांनी ड्रोनविषयी सखोल माहिती व तंत्रज्ञान विषयी माहिती दिली.

दरम्यान, दत्त साखर कारखान्याने नाविन्यपूर्ण शेतीमधील विशेष उपक्रम राबवून देशपातळीवर लौकिक मिळविला आहे , ऊस उत्पादन वाढीबरोबरच ऊस पिकाच्या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी दत्त कारखाना उद्योग समूह प्रयत्नशील आहे, त्यामुळे हा कारखाना देशपातळीवर आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया कृषीतज्ञ व शास्त्रज्ञांनी व्यक्त केली,

यावेळी ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, माती परिक्षण अधिकारी आर. ए . हेरवाडे यांनी पिकावरील ड्रोनद्वारे औषध फवारणी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करुन सखोल माहिती उपस्थिताकडून घेतली. (local news)

तज्ञ मंडळीकडून अत्यंत मोलाचे व सखोल माहिती मिळाली. ड्रोन मधील कार्यपध्दती विषयी फायदे, तोटे, चालविणेविषयी प्रशिक्षण, हाताळणी तसेच त्यापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ आर्थिकदृष्ट्या परवडणार की नाही. तसेच यामुळे शेतकºयांना कसा फायदा होवू शकतो, याविषयी सखोल चर्चा करुन त्यामधील दोष दुरुस्तीविषयी चर्चा केली. ड्रोन तंत्रज्ञान नाविन्य व अत्यंत महत्वाचे त्याचे फायदे तोटे श्ेतकºयांना जागृत करणेसाठी उपाययोजना यावर भर देण्यात आला, ड्रोन मधील स्पार्ट, त्याचे कार्यपध्दती, त्याची देखभाल दुरुस्ती, हाताळणी, त्यांच्या संगणकाची संपूर्ण माहिती व नुकसान टाळणेसाठी आवश्यक खबरदारी व उपाययोजना याबाबत शास्त्रज्ञ व ड्रोनचे तज्ञ व अधिकारी यांच्यामध्ये अनेक प्रश्नावरती चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *