मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने केला मोठा खुलासा, जाणून हादरला पती

(crime news) मोठी स्वप्न बाळगून चार महिन्यांपूर्वी लग्न (Marriage) केलेला युवक आता आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरापासून वाचण्यासाठी पोलिसांकडे मदत मागत आहे. जयपूरमध्ये पत्नीमुळे वैतागलेल्या एका पतीने विश्वकर्मा ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पीडित पतीचं असं म्हणणं आहे की पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची तर तिचा प्रियकर जीवे मारण्याची धमकी देत आहे. याच कारणामुळे हैराण झालेला पती आता पोलिसांकडे मदत मागत आहे.

पीडित पतीचं असं म्हणणं आहे की दोन्ही कुटुंब आणि पत्नीच्या सहमतीनेच आनंदात हे लग्न झालं होतं. यानंतर पत्नीने पतीसमोर या गोष्टीचा खुलासा केला की ती दुसऱ्याच युवकावर प्रेम करते (Affair of Wife). पीडित पतीने पोलिसांना सांगितलं की 17 नोव्हेंबर 2021 ला लग्न झालं होतं. हे लग्न कुटुंबीयांच्या आणि आमच्या दोघांच्या सहमतीने झालं होतं. लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री जेव्हा तो आपल्या खोलीत पत्नीच्या जवळ गेला तेव्हा पत्नी रागात त्याला- गेट आउट म्हणाली आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. तिने सांगितलं की ती अशोक नावाच्या युवकावर प्रेम करते आणि त्याचीच होणार. तिने सांगितलं की घरच्यांनी जबरदस्ती माझं लग्न लावलं आहे. (crime news)

हे ऐकून पती सदम्यात गेला. यानंतर त्याने आपल्या सासरच्या लोकांसोबत बातचीत केली. सासरकडचे लोक आपल्या मुलीला समजवाण्याऐवजी पीडित व्यक्तीवरच रागवू लागले. यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरापासून वाचण्याची मागणी केली. त्याने सांगितलं की त्याचा जीव धोक्यात आहे आणि पत्नी त्याला कधीही कोणत्याही गुन्ह्यात अडकवू शकते.

पीडित पतीचं म्हणणं आहे की त्याने पत्नीचा प्रियकर अशोक याला समजावून आपल्या पत्नीपासून दूर राहाण्यास सांगितलं होतं. मात्र त्याने ऐकलं नाही. इतकंच नाही तर अशोकने पीडित व्यक्तीला धमकीही दिली की पत्नीला कोणत्याही प्रकारे त्रास दिला किंवा तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुला जीवे मारेल. तीन महिने हे सगळं सहन केल्यानंतर पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली.

पीडित युवकाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की मागील तीन महिन्यांत त्याने आपल्या पत्नीला भरपूर समजावलं मात्र तिने काहीही ऐकलं नाही. प्रत्येकवेळी ती हेच म्हणते की ती आपल्या प्रियकराची आहे आणि त्याचीच होणार. वारंवार समजावल्यानंतर तिने खोट्या आरोपाक अडकवून गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. पत्नीचा प्रियकरही पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत आहे. एकदा अशोकने पीडित व्यक्तीच्या घरी येऊन त्याला मारहाणही केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *