शिरोळ रोटरी क्लब ने पुरस्कार देऊन महिलांचा केला सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिरोळ येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांनी अर्जुनवाड-मिरज मार्गावरील टारे क्लब हाऊस येथे सन्मान सोहळा आयोजित केला. या सोहळ्या मध्ये विविध क्षेत्रा मध्ये काम करण्याऱ्या महिलांचा फेटा बांधून पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. इंद्रायणी अमरसिंह पाटील, शिरोळ चे नगराध्यक्ष श्री.अमरसिंह माने पाटील, श्री.अतुल टारे , श्री. सचिन देशमुख, श्री दिपक ढवळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सोहळ्या निमित्त स्मार्ट सौभाग्यवती आणि किचन क्वीन स्पर्धा आयोजीत केल्या होत्या. त्यामध्ये स्मार्ट सौभाग्यवती विजेती पुरस्कार वैशाली भंडारे, अश्विनी माळी, सरिता माने यांना प्रदान करण्यात आला. तर किचन क्वीन पुरस्कार प्रथम-.वैशाली साळुंखे, द्वितीय-.रूपाली माने, तृतीय-वृषाली माने, उत्तेजनार्थ-सुरेखा जगदाळे व कल्पना ढवळे यांना प्रदान करण्यात आला.
तसेच उत्कृष्ट व्यावसायिका पुरस्कार विनिता पुजारी, सरस्वती चव्हाण यांना प्रदान करण्यात आला
याच बरोबर अपंग व कॅन्सरग्रस्त असूनही व्यायाम करून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत राज्यात प्रथम आणि देशात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या श्री.महेश राजाराम पाटील यांचा विशेष पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला