गणपतराव पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक
शिरोळ /प्रतिनिधी:
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे फार मोठे काम हाती घेतले आहे. शेतीयोग्य आणि उपजाऊ जमीन करण्याचे काम शिरोळ तालुक्यात चांगल्या पद्धतीने होत आहे. क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हा क्षारपडीच्या समस्येला तोंड देणार्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान बनून आलेला उपाय आहे. या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील प्रणेते गणपतराव पाटील यांच्या प्रयत्नातून, ज्ञानातून, तळमळीतून सुरू झालेला हा क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या मार्गाचा अवलंब करावा. जास्तीत जास्त लोकांना या मॉडेलमध्ये आणावे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती साधेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
अकिवाट (ता. शिरोळ) येथे ५०० एकर क्षारपड जमीन सर्व्हेचा शुभारंभ आणि मजरेवाडी येथे २५० एकरावर मुख्य पाईपलाईन टाकणे कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ, दत्तचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल रेखावार हे बोलत होते. शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे चांगले प्रयोग करीत आहेत हे कौतुकास्पद आणि आनंददायी असून यामधून शेतकऱ्यांनी कुटुंबाचे आणि गावचे कल्याण साधावे. क्षारपडीच्या समस्येबरोबरच इतर कामांना आपले सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गणपतराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी क्षारपड जमिनीच्या कामाला कोणतीही अडचण येवू देणार नाही. क्षारमुक्त जमिनीची किंमत वाढत आहे. पुढच्या पिढीला उपजाऊ जमीन मिळत आहे ही सकारात्मक बाब दिसते आहे. शेतकर्यांना अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. महापूर बुडीत क्षेत्रामध्ये शंभर एकरावर बीट लागवड करून सर्व प्रकारचे मार्गदर्शन दत्त कारखान्यामार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तहसीलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ यांनीही क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे कौतुक करून अशा वेगळ्या प्रयोगामध्ये शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घ्यावा व प्रगती साधावी असे सांगितले.
शिरोळ येथील श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा कामाची पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केली. गेली ३०-३५ वर्षे पडीक असलेल्या जमिनी पिकाऊ बनणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील नरदेकर, गुरुदत्त देसाई, संजय चव्हाण यांच्यासह सर्व संचालक, दत्त कारखान्याचे सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, शक्तीजीत गुरव, संजय सुतार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मजरेवाडी व अकिवाट येथे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनायक नरूटे यांनी केले. स्वागत नंदकुमार पाटील यांनी केले. रवि नरूटे, मारूती कोकणे, अजित कागले, सुरेश गवंडी, महेश नरूटे, भालचंद्र खुरपे, बाबुराव खुरपे, शिरिष कागले, वसंत नरूटे,भुपाल बुबनाळे, रमेशकुमार मिठारे, अमर बुबनाळे, धोंडिराम साबळे, नेमा हिरुकुडे, अशोक चव्हाण, शांतिनाथ कोटे, ग्रामसेवक रविंद्र वैरागे, तलाठी अभिजीत पाटील, मंडळ अधिकारी काळगे, श्रीहरी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
अकिवाट येथे मनोगत सरपंच विशाल चौगुले, पासगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. रावसो नाईक, सुनील रायनाडे, अविनाश रायनाडे, काकासो आवटी, महावीर किनिंगे, राजेंद्र पिंपळे, शांतीसागर कल्लन्नावर, रोहित दानोळे, विजय नाईक, जयकुमार खोत, आप्पासो चिंचणे, चंदू कुलकर्णी, सागर किनिंगे, मल्लाप्पा पाणदारे, राजेंद्र पाणदारे, सुभाष पाटील, रघु पोवार, मनोहर रायनाडे, काशिनाथ पाणदारे आदी उपस्थित होते