जयश्री जाधव यांचा विजय निश्चित : खासदार मंडलिक
महिलांचे (women) सामाजिक क्षेत्रातील योगदान वाढावे व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जयश्री जाधव यांना साथ द्या. कोल्हापूरातील जनतेचा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय निश्तिच आहे असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मंडलिक यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच कोपरा सभा, बैठकांवर भर दिला आहे.
खासदार मंडलिक यांनी राजारामपुरी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन स्व.आमदार चंद्रकांत जाधव यांनी उत्तर मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. मंडलिक म्हणाले, स्व.आमदार चंद्रकांत जाधव यांनी महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले. आजपर्यंत हजारो महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करुन स्वावलंबी, आत्मनिर्भर झाल्या. महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक पुढे नेण्यासाठी जयश्री जाधव यांना बहुमताने विजयी करा.
शिवसेनेचा स्वाभिमान डिवचणाऱ्या भाजपला स्वाभिमानी शिवसैनिक जागा दाखवून देतील. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला (women) आमदार बनवण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले.