अंबाई टँक बेछूट गोळीबार प्रकरण; मानसिंग बोंद्रेला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
बाई टँक परिसरात झालेल्या बेछूट गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित मानसिंग विजय बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. १२ डिसेंबर, २०२१ रोजीच्या मध्यरात्री गोळीबाराचा थरार घडला होता. जुना राजवाडा पोलिसांनी मानसिंग बोंद्रे याच्यासह चौघांविरुद गुन्हा दाखल केला होता.
Ranbir Kapoor : आलिया भट्टच्या आधी रणबीरच्या आयुष्यात आल्या ‘या’ अभिनेत्री
मुख्य संशयित मानसिंग बोंद्रे वगळता अन्य तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र मानसिंग फरार राहिला होता. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंधरवड्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.मानसिंग बोंद्रे यांच्यावतीने ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला होता. त्यावर आज सकाळी न्यायमूर्तींनी निकाल देऊन मानसिंग बोंद्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या कारणातून हा प्रकार घडला होता.
पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स तिसऱ्यांदा आई होणार
सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांनी याप्रकरणी मानसिंग बोंद्रे याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
आपणासह वृद्ध मातेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मानसिंग बोंद्रे याने घराच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संयुक्त पथक चार महिन्यांपासून मानसिंग बोंद्रेच्या मागावर होते.