अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
(entertenment news) अभिनेत्री सनी लिओनीला तुम्ही हॉट ग्लॅमरस आणि सिनेमांमध्ये बोल्ड सीन देताना पाहिलं. पण सनी स्वयंपाक घरात देखील उत्तम जेवण बनवते… यावर कोणाला विश्वास बसणार नाही. पण सनीचा जो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून असं म्हणायला हरकत नाही की, सनी अभिनेत्रीसोबतचं एक सुगरण देखील आहे..
टॉलिवूड अभिनेता Manchu Vishnu ने सनीचा एक व्हिडीओ इन्स्टास्टोरीवर शेअर केला. व्हिडीओमध्ये सनी स्वयंपाक घरात पराठे बनवण्यासाठी तयारी करतानी दिसली.
व्हिडीओमध्ये सनी दक्षिण भारतीय लूकमध्ये दिसत आहे. निळ्या, लाल आणि हिरव्या रंगाच्या पारंपारिक ड्रेसमध्ये सनी लिओनी अप्रतिम दिसत आहे. सध्या जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये सनीच्या हातात गोल आकाराचा पराठा दिसत आहे.
सनीने केलेल्या पराठ्याला पाहून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, की एक अभिनेत्री तर आहेचं… पण कुकिंगमध्ये देखील सनी अव्वल आहे. सध्या सनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (entertenment news)
सनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिचे अनेक सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सनी ‘शेरो’, ‘वीरामादेवी’ सिनेमांमध्ये दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘वीरामादेवी’ सिनेमातून सनी टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.