शिरोळमधील हेरवाडला विधवा प्रथेवर बंदी
राजर्षी शाहू छत्रपतींची स्मृती शताब्दी होत असताना कोल्हापूरने राजर्षींचा पुरोगामी वारसा कृतिशीलपणे पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येेथील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. महिलांनी यासाठी पुढाकार घेऊन समाजात विधवा म्हणून अपमानाचे जगणे झुगारून देण्याचे ठरविले आहे.
कोल्हापूर : पन्हाळा मुख्य रस्ता सुरू
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरताना अनेक अडचणी येतात. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसले जाते, गळ्यातील मंगळसूत्र तोडण्यात येते. हातातील बांगड्या फोडून, पायातील जोडवी काढून घेतली जातात. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.
सोलापूर : अल्पवयीन मुलीला आईनेच ढकलले वेश्या व्यवसायात
कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. विधवा प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होतो आहे. यापुढे हेरवाड तालुका शिरोळ येथे विधवा प्रथा बंद करण्यात येत असल्याचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेने केला आहे. सौ. मुक्ताबाई संजय पुजारी या आमसभेत झालेल्या या ठरावाच्या सूचक असून, सौ. सुजाता केशव गुरव या अनुमोदक आहेत.