उमळवाडमध्ये कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाची धडक कारवाई

(crime news) बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेल्या सहा तलवारी आणि गांजासद़ृश अमली पदार्थ असा 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल रविवारी उमळवाड (ता. शिरोळ) येथे जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दिलदार चौगोंड कांबळे (रा. बौद्ध विहारजवळ, उमळवाड) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाने केली. याबाबतची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पद्माकर पुजारी यांनी दिली आहे.

कांबळे याच्याकडे तलवारी व अमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरी छापा टाकण्यात आला. सहा तलवारी, 1590 ग्रॅम वजनाचा गांजासद़ृश अमली पदार्थ, लहान वजन काटा असा एकूण 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, पोलिस उपनिरिक्षक प्रीतमकुमार पुजारी, प्रमोद वाघ, प्रशांत सकपाळ, सतीश बाबरे यांच्यासह पथकाने केली. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *