श्री दत्त पॉलिटेक्निक मध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
शिरोळ (प्रतिनिधी):
(local news) शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दिनांक 26 जून 2022 रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी त्याच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी समाजामध्ये समता व बंधुता निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निर्णय शाहू महाराजांनी घेतले.
यावेळी ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे, मिस पी. बी.पाटील, सुविधा केंद्राचे समन्वयक एस. एम. कुलकर्णी , स्कॉलरशिप विभागाचे उमर आगलावणे तसेच संस्थेतील इक्वल अपॉर्च्युनिटी विभागाचे ए. डी. कांबळे मॅडम तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते. (local news)