कृषी संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत ,यड्राव येथे कृषी विभाग पंचायत समिती शिरोळ यांच्यातर्फे कृषी योजनांची माहिती देउन शेतकर्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या वतीने चालू असलेल्या कृषी संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत , कृषी विभाग पंचायत समिती शिरोळ यांच्यातर्फे यड्राव बौद्ध समाज मंदीर येथे कृषी अधिकारी तथा सहा. गट विकास अधिकारी मा. सुरेश दानवाडकर सोा यांनी मागासवर्गीय शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान उंचावणेकरीता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मध्ये असलेल्या नवीन विहीर व जुनी विहीर व इतर पॅकेज संबंधित माहिती दिली.
तसेच कृषी अधिकारी बावधनकर मॅडम यांनी जिल्हा परिषद सेस फंड यांच्या माध्यमातून देण्यात येणारे कृषी साहित्य व कृषीक ॲपचा वापर करुन विविध पीक ,पीकांवरील रोग यासंबंधी माहिती व सर्व शासकीय योजनांची माहिती या अॅप द्वारे कशी मिळवता येते याबद्दल माहिती सांगितली.
यावेळी कृषी अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी मा. सुरेश दानवाडकर सो ,कृषी अधिकारी बावधनकर मॅडम व विस्तार अधिकारी(कृषी) मा. भिमराव गोवंदे सोा, यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन व शंका निवारण केले व व तसेच सर्व ग्रामस्थांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.