डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून यड्राव ता. शिरोळ येथील लाभार्थीच्या विहीरीचे जल पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या वतीने चालू असलेल्या कृषी संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत , कृषी विभाग पंचायत समिती शिरोळ यांच्याकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनातून यड्राव ता. शिरोळ येथील लाभार्थी श्री. रवि विष्णू कांबळे यांची नविन विहीर खुदाई व बांधकाम पूर्ण झाले असून त्यांच्या विहीरीचे जल पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर सोा यांच्या हस्ते श्रीफल वाढवण्यात आला. तसेच कृषी अधिकारी तथा सहा. गट विकास अधिकारी मा. सुरेश दानवाडकर सोा यांचा सत्कार मा. निंबाळकर सोा यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर सोा, कृषी अधिकारी तथा सहा. गट विकास अधिकारी मा. सुरेश दानवाडकर सोा, कृषी अधिकारी मा. बावधनकर मॅडम, विस्तार अधिकारी(कृषी) मा. भिमराव गोवंदे सोा, लाभार्थी श्री. रवि विष्णू कांबळे , यड्राव ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.