नांदणीत आज संध्याकाळी शेतकरी मेळावा
(local news) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने आज दिनांक 1 जुलै 2022 रोजी कृषी दिनानिमित्त सायंकाळी 5:30 वाजता नेहरू सभागृह नांदणी, तालुका शिरोळ येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन.
उद्घाटक:- बसवराज बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- सौ. संगीता तगारे, सरपंच नांदणी.
यावेळी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विद्या केंद्र कालवडेचे प्रमुख -डॉक्टर निलेश मालेकर यांचे सेंद्रिय कर्बाचे शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी महत्त्व याविषयी मार्गदर्शन तसेच सौ. तेजा संजय घोरपडे यांचे मधुमक्षिका पालन व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. नांदणी व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. (local news)