शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये सुरू असलेल्या शासनमान्य सुविधा केंद्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ/प्रतिनिधी:
शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासनाचे सुविधा केंद्र (एफ. सी.) सुरु असून डिप्लोमा प्रवेशासाठी फॉर्म भरून तो कन्फर्म करून घेण्यास विद्यार्थ्यांचा (student) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि सुविधा केंद्राचे समन्वयक एस. एम. कुलकर्णी यांनी दिली.
यावर्षी दहावीच्या निकालापूर्वीच अभियांत्रिकी डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता डायरेक्टर बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन डिप्लोमा प्रवेश फॉर्म भरून तो कन्फर्म करून घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत १४ जुलै पर्यंत आहे. त्यानंतर १६ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. १६ ते १८ जुलै दरम्यान गुणवत्ता यादीमध्ये तक्रार करण्यास मुदत असेल. १९ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना (student) अर्ज दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन व अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी वाढवून दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रास भेट देवून आपला अर्ज दाखल करण्याचे आवाहन ट्रस्टचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि प्राचार्य पी. आर. पाटील यांनी केले आहे. यावेळी एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे, मिस पी. बी.पाटील, तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.