माहिती अधिकार पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अर्जुन पवार यांच्या हस्ते शालेय गोरगरीब मुलांसाठी वह्या वाटप

प्रतिनिधी:- विजय पाटील

(local news) धरणगुत्ती हद्दीतील सावित्रीबाई फुले विद्यामंदिर या शाळेमध्ये शिकत असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. वाढत्या महागाईमुळे आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना घराची परिस्थिती सांभाळणे व आपल्या मुला बाळांच्या शिक्षणाचा खर्च बघणे हे कठीण होत चालले आहे.

जगभरातील बदलत्या जीवनामुळे शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांना शिक्षणाचा खर्च बघणे हे अधिक कठीण जाते व वासे कुटुंब शिक्षणापासून वंचित राहिले जातात. शिक्षणापासून गरीब व होतकरू विद्यार्थी दूर राहू नयेत यासाठी माहिती अधिकार पत्रकार संघाचे अर्जुन पवार शिरोळ तालुका अध्यक्ष यांनी सावित्रीबाई फुले विद्यामंदिर, धरणगुत्ती या शाळेमध्ये गरीब मुलांसाठी वह्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी पर्यावरण विभाग काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप जकरे, शिरोळ तालुका युवक वलीम जमादार, सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे, मा. नगरसेवक जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन बागे, मुख्याध्यापक मिराबान हकीम, शिक्षिका प्रतिभा साळुंखे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *