रविवारी गणेश बेकरी नांदणी येथे निवेदन देवून ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी:- विजय पाटील

युनिक सिक्युरिटी मार्फत माहे जूनमध्ये जयसिंगपूर उमळवाड बस्तवाड हरोली व आसपासच्या गावांतून सिक्युरिटी गार्ड (Security guard) भरती करण्यात आली होती. व कामासाठी नांदणी येथील गणेश बेकरीचा पॉईंट देण्यात आला होता. युनिक सिक्युरिटी मार्फत त्यांना अकरा हजार पाच शे रुपये महिन्यांच्या पगाराचे गाजर दाखवण्यात आले.अकरा हजार पाचशे महिन्याच्या पगारातील एक हजार पाच शे रूपये पीएफ व ईएसआय कटिंग करून दहा हजार रुपये देण्यात आले व दुसर्या महिन्यामध्ये काम करीत असताना अचानकपणे दिनांक 23 ऑगस्ट रोजी उद्यापासून कामावर येऊ नका तुमचे वय पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहे व कंपनीमध्ये पंचेचाळीस वर्षांच्या वरील गार्ड नको असल्याचे सांगण्यात आले आहे अशा प्रकारचा मेल आला आहे असे सांगण्यात आले.

मुळातच कामावर भरती (Security guard) करून घेत असताना त्यांचे ओरिजिनल पॅनकार्ड व आधारकार्ड कंपनीने जमा करून घेतले होते त्यावेळी वयाचे कोणतेही बंधन वा वयाची अट सांगण्यात आली नव्हती. या सर्व गोष्टींबाबत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे तसेच दलित सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंघाई यांच्याशी चर्चा करून घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल ची माहिती देत पूर्ण महिन्याचा पगार, युनिक कंपनीने जमा करून घेतलेले ओरिजनल आधार कार्ड व पॅन कार्ड तसेच मागील महिन्यातील इएसआय व पीएफ नावाखाली जमा करून घेतलेली रक्कम व युनिक गणवेशापोटी कटिंग करून घेतलेली रक्कम मिळवून देण्याबाबत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र माध्यमातून शिरोळ पोलिस ठाणे शिरोळ याठिकाणी रविवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गणेश बेकरी नांदणी यांच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *