आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना

(crime news) आई ही आपल्या मुलांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असते. मुलांना काहीही सहन करावं लागू नये यासाठी आई अनेकदा स्वतःचा जीवही धोक्यात घालते. मात्र, अहमदनगरमधून आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केला. मुलीची आईही या गुन्ह्यात सहभागी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेनं आपल्या मुलीला जबरदस्तीने 50 वर्षीय व्यक्तीसोबत संबध ठेवण्यास भाग पाडलं आहे.

आपल्या समाजात असं करावं लागत असल्याचं सांगून आईकडून मुलीवर दबाव टाकण्यात आला. मात्र, मुलीने नातेवाईकांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news)

समाजातील अनिष्ट रूढी परंपरेचा धाक दाखवत आपल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलीला परपुरूषाशी शरीरसंबध ठेवण्यास आईने भाग पाडलं. आईने धमकावल्याने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर होणारा अत्याचार सहन केला. मात्र पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न झाल्यावर तिने कशीबशी आपली सोडवणूक केली आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

आठवीत शिकणा-या या निरागस मुलीला आपली आई आपल्याला काय करायला लावते याची पुसटशी कल्पनाही नव्हती. मात्र आईचा धाक आणि नराधमाच्या अत्याचाराला ती बळी पडली. ‘वयात आल्यानंतर परपुरूषाबरोबर झोपावं लागतं. आपल्या समाजाची ही प्रथा आहे. मी पण तेच केलं, असं सांगून या आईने आपल्या मुलीला परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *