कैलासवासी ए. वाय .पाटील सैनिक विकास सेवा संस्थेची सलग चौथ्या वर्षी पाच टक्के डिव्हिडन्स वाटप
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
(local news) सैनिक टाकळी :-तालुका शिरोळ येथील ए. वाय .पाटील सैनिक विकास सेवा संस्था मर्यादित टाकळी यांच्यावतीने आज सलग चौथ्या वर्षी सभासद शेअर्स रकमेवर पाच टक्के प्रमाणेडिव्हिडीन्ड वाटप करण्यात आले.
सोबत दिवाळीसाठी आकर्षक भेट वस्तू ही देण्यात आली. त्यावेळी संस्थेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक मंडळ हितचिंतक मार्गदर्शक व सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी सर्व सभासदांनी संचालक मंडळाचे कर्मचाऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात सदर उपक्रमाबद्दल अभिनंदन केले तसेच भविष्यातही सभासद व संचालक मंडळ यांच्यातील स्नेहबंध राहुद्यात असे मत सभासदांनी व्यक्त केले. (local news)
त्याला संचालक मंडळाने टाळ्याच्या गजरात दुजोरा दिला. या संस्थेचे सैनिक टाकळी मध्ये कौतुक होत आहे.यावेळी सर्व ग्रामस्थ ,सभासद ,उपस्थितीत होते.