घोसरवाड मध्ये क्रिकेट मैदान वाचण्यासाठी क्रिकेट प्रेमींचे शर्तीचे प्रयत्न….
टाकळीवाडी प्रतिनिधी:- नामदेव निर्मळे
घोसरवाड तालुका:- शिरोळ जिल्हा:- कोल्हापूर येथील पाझर तलाव येथे घोसरवाड गावातील क्रिकेट प्रेमी यांनी सुमारे दहा लाख रुपये खर्च करून मैदान तयार केले आहे. लोकवर्गणीतून एवढी मोठी रक्कम जमा करून घोसरवाडच्या ऐतिहासिक पाझर तलावात एक चांगल्या प्रकारचे मैदान (field) तयार केले.
परंतु वनाधिकारी यांनी हे मैदान उखरण्याचे काम केले आहे.गावातील क्रिकेट प्रेमी हौशी यांनी गांधी मैदान चषक 2022 कोल्हापूर येथे चांगली कामगिरी केली होती.क्रिकेट खेळामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक सुद्धा झाले होते .साध्या खेड्या गावातून एक चांगले क्रिकेट खेळाडू बनत आहेत.यावेळी अनेक क्रिकेट प्रेमींनी मैदान वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पंचक्रोशीत असे मैदान कोठेही नाही.क्रिकेट,व्यायाम,रनिंग,तरुणांना भरती साठी व वृध्दांना फिरण्यासाठी या मैदानाचा गेली वीस वर्षे या मैदानाचा वापर होत असताना वन विभागाकडून मैदान जेसीबीच्या सहाय्याने उकरून टाकण्यात येत आहे.
गावकऱ्यांनी विरोध केला असता त्यांच्यावरही कारवाई करण्याचे बोलत आहेत. तसेच खेळाडू व गावकऱ्यांनी जर वर्षी लागणाऱ्या वणवे व जनावरांपासून झाडांचे संरक्षण केले आहे. सर्व क्रिकेट प्रेमी यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हाधिकारी मा.श्री.राहुल रेखावर साहेब यांना सूचना दिले आहेत.क्रिकेट मैदान विषय मार्गी लावण्यासाठी .
कष्टातून, परिश्रमातून हे मैदान (field) लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांनी कष्टाने हे मैदान तयार केले .त्याची प्रशंसा सुद्धा झाली.मौजे घोसरवाड येथील एकून भू क्षेत्रापेकी 7% जमीन ही वनविभागाने व्यापलेली आहे.
याच वनविभागामधे ऐतिहासिक पाझर तलाव १९७२ साली श्रमदान योजनेतून तयार झाला.पाझर तलाव पुर्वज्यांच्या श्रमदानातून साकारण्यात आला.पण याच तलावा मधे क्रीडागणाला तातपुरती परवानगी मिळाली होती.तलावाचे अस्तीत्व जवळजवळ नष्ट झाले आहे. क्रिकेट प्रेमींची एवढीच इच्छा आहे की अतिशय कष्टाने मैदान तयार झाले आहे व मैदान मिळावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.