जयसिंगपूर पोलीस व गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी 48 तासात गुन्हा उघडकीस
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये भा.द. वि.स. कलम 379 प्रमाणे जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी भरत शिवलिंग एकसंबे, वय.29 व्यवसाय:-ट्रान्सपोर्ट, राजीव गांधीनगर गल्ली नंबर 6 येथून MH:-14.AH-6768 यांचा चेरी रंगाचा लाकडी बॉडी असलेला ट्रक दिनांक.9/10/22 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ते दिनांक 10/10/22 रोजी सायंकाळी 9 वाजता चे दरम्यान श्री जय मल्हार ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर रोडवरून अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. भरत एकसंबे यांनी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सो यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सांगितले होते. गुन्हे शोध पथक जयसिंगपूर तपास करीत असताना गुन्हे शोध पथकातील पो.कॉ.1333 रोहित डावाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर गुन्ह्यातील संशय आरोपी निलेश नरसु फाकडे. वय.25, रा.हरिपूर, सांगली. सध्या राहणार गल्ली नंबर 13 जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर. संशयित आरोपी निलेश फाकडे चोरीस गेलेल्या ट्रकचा सौदा करण्याकरिता कोंडिग्रे फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकातील पो.कॉ.रोहित डावाळे, पो. कॉ.संदेश शेटे, पो. कॉ. वैभव सूर्यवंशी, यांनी सापळा रचून त्यास नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव निलेश नरसु फाकडे. वय.25, रा.हरिपूर, सांगली. सध्या राहणार गल्ली नंबर 13 जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर. असे सांगितले सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता सदर ट्रक चोरीचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. सदर चोरीस गेलेला ट्रक पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक 2077 विजया पाटील करीत आहेत. (local news)
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सो. जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजारे, म. पोलीस नाईक विजया पाटील,पो.कॉ.रोहित डावाळे, पो. कॉ.संदेश शेटे, पो. कॉ. वैभव सूर्यवंशी,पो. कॉ.पाटील,होमगार्ड.राकेश माने व मिलन शिंगाडे यांनी केली आहे.