दत्तवाड तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अखेर अड. सुरेश पाटील बिनविरोध
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
(local news) दत्तवाड तालुका शिरोळ येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी एडवोकेट सुरेश नरसगोंडा पाटील यांची अखेर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सदर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे हे होते.
येथील तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी सहा अर्ज आल्याने गोंधळाची तसेच तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठीच तंटा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सदर निवड ही बिनविरोध व्हावी यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी प्रयत्नशील होते. निवडीच्या आदल्या दिवशी याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत इतर पाच उमेदवारांनी गावाच्या हितासाठी व गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी या चांगल्या हेतूने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एडवोकेट सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी राहिल्याने त्यांची सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. शांततेने सदर निवड बिनविरोध पार पडल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. (local news)
याप्रसंगी उपसरपंच सौ रुपाली पोवाडी, ग्रामसेवक संतोष चव्हाण, तलाठी इकबाल मुजावर, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उदय पाटील, नूर काले, अशोक पाटील, राजगोंडा पाटील, बाबुराव पोवार, संजय पाटील, देवराज पाटील, ए.सी.पाटील आदीसह तालुक्यातील तीन विस्तार अधिकारी, चार गावातील ग्रामसेवक, सर्व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.