शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सामील
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
(political news) आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वर्षा या निवासस्थानी मीटिंग झाली. बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख पदी मा. सतीश भाऊ मलमे यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर शिरोळ तालुका प्रमुख पदी उदय झुटाळ, उपतालुका प्रमुख पदी संभाजी गोते, सुरज भोसले व जयसिंगपूर शहर प्रमुख पदी रतन पडियार , शिरोळ शहर प्रमुख पदी जुगल गावडे आदींच्या निवडी करण्यात आल्या. (political news)
या बैठकीत प्रसंगी तालुक्याचे आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब ,खासदार संजय दादा मंडलिक ,जयसिंगपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय संजय पाटील यड्रावकर ,सचिन डोंगरे, दादासो नाईक, अशोक शिंगाडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.