विद्या मंदिर टाकळीवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती ची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड कार्यक्रम संपन्न…
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका :-शिरोळ ,जिल्हा:- कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळा (school) कुमार विद्यामंदिर येथे शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष ,उपाध्यक्षपदी ,निवड कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी सौ .शुभांगी कृष्णा खोत ,उपाध्यक्षपदी सौ.मनीषा उमेश निर्मळे तसेच सर्व सदस्य यांची निवड करण्यात आली. शिक्षक दत्तात्रय कदम बोलताना म्हणाले की शाळेसाठी माजी सैनिकांची योगदान फार मोठे आहे.तसेच संभाजीराजे पतसंस्था यांनी आतापर्यंत शाळेला 40,000/- रुपयाची मदत केली आहे.
शिरोळ तालुक्यात टाकळीवाडी शाळा (school) एक नंबर ला आहे.क्रीडा स्पर्धेमध्ये अग्रेसर आहे.आतापर्यंत भरपूर बक्षिसे मिळवली आहेत.शाळेने व सर्व विद्यार्थ्यांचे पालकांनी आतापर्यंत चांगली साथ दिली आहे.
यावेळी सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच बाळाबाई हक्के सर्व ग्रामपंचायत सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सर्व पालक, गावातील सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी उपस्थितीत होते.