13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार
(crime news) बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. प्रमोद सोमनाथ सलगर (रा. मुंगी ता. धारुर जि. बीड) असं नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. (दि. 22) ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. यानंतर पिडीत मुलगीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
यादरम्यान पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जाबाबात म्हटलंय की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमुद गुन्हयात 376 (2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4, 6, 17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे. (crime news)