टाकळीवाडीच्या तुकाराम भमाने याचा प्रामाणिकपणा

टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील तुकाराम भमाने हे दत्तवाड टाकळीवाडी रोडवर सरकारी दवाखान्याजवळ त्यांना मोबाईल (mobile) पडलेला दिसला .

मोबाईल च्या कव्हर मध्ये 700/- रुपये रोख व मोबाईल 6000/- हजार रुपये किमतीचा असा मुद्देमाल होता. दत्तवाड येथील बाबू वडर हे मोबाईल (mobile) शोधत शोधत येत होते. तुकाराम भमाने यांनी खात्री करून बाबू वडर यांना प्रामाणिकपणे मोबाईल व रोख रक्कम दिले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज अजून सुद्धा कुठेतरी प्रामाणिकपणा शिल्लक आहे.हे बघायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *