शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव झळकावले

(sports news) जगभरात सर्वात मानांकित व कठीण मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन ( Ironman ) / ट्रायॲथलाॅन ( Triathlon ) या स्पर्धेत शिरोळचे सहायक निबंधक प्रेम राठोड यांनी सांगली येथील अँम्बिशियस इंन्डूरन्स क्लबचे कोच किरण साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा पार करून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव झळकावले.

गोवा येथे १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या आयर्नमॅन द्वारा आयोजित गोवा ७०.३ या स्पर्धेचे आयोजन गोवा येथील योसका ( YOSKA) या संस्थेने केले होते. स्पर्धेचे उद्घघाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे १९०० मीटर खुल्या समुद्रात पोहणे, ९० कि.मी सायकलिंग आणि २१ कि.मी. धावणे असे स्वरूप होते.

या स्पर्धेत ३३ देशातून १२९५ स्पर्धक सहभागी झाले होते. यातील ७१९ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. किरण साहू यांच्या अँम्बिशियस इंन्डूरन्स क्लब सांगली च्या १९ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धेवेळी गोवा येथील वातावरण उष्ण – दमट, जोराचा वारा व खडतर चढ यामुळे ही स्पर्धा अजून कठीण बनली. या स्पर्धेसाठी राठोड हे गेले तिनवर्षापासुन सराव करत होते. त्यांनी सात तास छप्पन्न मिनिटात आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तंत्रशुद्ध सराव, योग्य आहार, शारीरिक क्षमतेनुसार मार्गदर्शन यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरीत्या पुर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.राठोड यांच्या बरोबर सांगलीचे प्रसन्ना करंदीकर, डॉ. नवनाथ इंदलकर, निलेश भोसले, अक्षय अवटी, अमित सोनावणे, सचिन पवार, सुधीर भगत, शितल नवले, अस्लम मुरसल, दीपक माळी, इंद्रजित सुर्यवंशी, अतहर जमादार, मनोज देसाई, दिनेश पवार, प्रदीप सुतार, अभिनंदन चिंचवाडे, संजय चव्हाण, श्यामकुमार जाधव या ॲम्बिशिएस इन्डूरन्स क्लबच्या खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. रिले प्रकारात धावणे मध्ये शिल्पा दाते/काळे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. (sports news)

याशिवाय सांगलीतून सुरेंद्र पाश्चापुरकर व संतोष शिंदे यांनी वैयक्तिक प्रकारात व अमित पेंडूरकर व केतन गद्रे यांनी रिले प्रकारात ही स्पर्धा पूर्ण केली. अमर्त्य सुतार व सारिका सुतार यांनी आयर्न किड्स ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेतील सर्व खेळाडूना पाणी, एनर्जी ड्रिंक, फळे, थंड पाण्याचे फवारे, स्पंज इ. देण्यासाठी ४२ स्वयंसेवक सहभागी झाले होते.आयर्नमॅन राठोड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *