महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
(local news) श्री. राहुल गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्यातील गायरान जमीनीवरील एकूण २ लाख २३ हजार अतिक्रमणे काढण्यात यावीत असा उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला आहे.
यामध्ये अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत. यासाठी अतिक्रमण काढण्या संदर्भातील फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन आज तहसीलदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुक्याचा वतीने देण्यात आले. आमची मागणी महाराष्ट्र सरकारकडे लवकरात लवकर कळवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी, मा. तालुकाध्यक्ष, कुमार पुदाले, तालुका सचिव, श्रीकांत सुतार, तालुका उपाध्यक्ष, संतोष केटगाळे, शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष, दुधेश्वर पांडव, जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष, अमित पाटील, मनविसे तालुकाध्यक्ष केतन अलगुरे, सचिन सुर्यवंशी, सुमीत हजारे, भास्कर कोळी ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (local news)