मिरजेत रिक्षाचालकावर चाकू हल्ला

(crime news) येथील शासकीय रुग्णालय येथे रिक्षा जवळून नेल्याच्या कारणावरून रिक्षाचालक अनिकेत अरूण सूर्यवंशी (वय 23, रा. आंबेडकर नगर, मिरज) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांनी रमेश बिशुकर्मा (रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ मिरज), रोशन बिरसांगे जनाला (रा. अल्फोन्सा स्कूलजवळ, मिरज) या दोघांविरुद्ध गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, अनिकेत सूर्यवंशी हे रिक्षा घेऊन मिरज शासकीय रुग्णालयाच्या गेटजवळून चालले होते. यावेळी तेथे थांबलेल्या रमेश बिशुकर्मा याच्याजवळून रिक्षा गेली. याचा राग आल्याने रमेश व रोशन या दोघांनी अनिकेत यांना अडवून जाब विचारला. यावेळी शिवीगाळ करून कांदा कापण्याच्या चाकूने वार केला. यामध्ये सूर्यवंशी जखमी झाले. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *