श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न

टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे

(local news) श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचालित श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुदत्त शुगरचे संचालक श्री बबन चौगुले व जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले, विद्यमान सरपंच श्रीमती मंगल बिरणगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

मुख्याध्यापक संजय तपासे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण झाल्यानंतर क्रीडा ज्योतीचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी यांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी क्रीडा स्पर्धेला समर्पित समूहनृत्य व हलगी नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले. उपस्थित मान्यवर अतिथींचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. (local news)

यानंतर क्रीडा मैदानावर श्री विकास चौगुले यांच्या हस्ते नाणेफेक करून क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमास माजी सरपंच श्री बाबासो वनकोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केंदबा कांबळे, शालेय समितीचे अध्यक्ष जितेंद्र कोथळी, शालेय समितीचे सदस्य खुशाल कांबळे, प्रकाश गोरवाडे, आप्पासो बस्तवाडे, महावीर पाटील, चंद्रकांत निर्मळे, माजी सैनिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. एस. ए पाटील व नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

दिनांक 27, 28 डिसेंबर 2022 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धा, 29 डिसेंबर रोजी अपूर्व विज्ञान मेळावा रांगोळी प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे, दि.30 डिसेंबर रोजी फनी गेम्स व खाद्ययात्रा, 31 डिसेंबर रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *