तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नाटयीकरण विभागात वि. मं. टाकळीवाडी अजिंक्य

पत्रकार:- नामदेव निर्मळे

पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळ यांच्या वतीने हसूर ता.- शिरोळ येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत (cultural competition) लहान गटात नाटयीकरण विभागात वि. मं. टाकळीवाडी या शाळेने प्रथम क्रमांक मिळवत यशस्वी परंपरा कायम ठेवली. या यशामुळे या शाळेचा संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरला. तसेच क्रीडा स्पर्धेसाठी कुस्ती विभागात नीलम निर्मळे 40 किलो, व शिफा जमादार 25किलो वजनी गटात या पूर्वीच जिल्हासाठी पात्र झाल्या आहेत .

या विध्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख श्री. धोंडीराम बाबर सर,सौ मनीषा दळवी मॅडम, सौ शर्मिला कोल्हापुरे मॅडम व श्री दत्तात्रय कमते सर यांचे तर सांस्कृतिक विभागासाठी श्रीम. छाया कांबळे मॅडम सौ. तेजस्विनी गायकवाड मॅडम व श्री मदनकुमार कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री संजय दळवी सर केंद्रप्रमुख श्री रमेश कोळीसो, गटशिक्षणाधिकारी श्री कामतसो, विस्तारअधिकारी श्री. ओमासेसो यांची प्रेरणा मिळाली.तर विध्यार्थी, त्यांचे पालक व टाकळीवाडी ग्रामस्थ यांचे बहुमोल असे सहकार्य मिळाले. (cultural competition)

उज्वल यश प्राप्त केलेबद्दल सहभागी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे हार्दिक -हार्दिक अभिनंदन!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *