श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेचे अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे आणि जनरल सेक्रेटरीपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड

(local news) शिरोळ प्रतिनिधी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ द्वारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेचे अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे आणि जनरल सेक्रेटरीपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आहे संघटनेच्या वार्षिक सभेत पाच वर्षाच्या कालावधी करिता कार्यकारी समितीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शर्करा औद्योगिक श्रमिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषय पत्रके वरील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजुरी दिली या सभेत कामगार संघटनेच्या कार्यकारणीच्या काळ तीन वर्षावरून पाच वर्षे करण्यात आला. सन 2023 ते 2028 या पाच वर्षाच्या कालावधी करता कार्यकारणी समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रदीप बनगे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तर अरुण पाटील यांची जनरल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (local news)

शर्करा औद्योगिक श्रमिक संघाची कार्यकारणी अशी अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रदीप बनगे उपाध्यक्ष संपत पाटील सहउपाध्यक्ष आसदअल्ली पाटील विजय वाणी जनरल सेक्रेटरी अरुण पाटील सहसेक्रेटरी धोंडीबा पाटील चंद्रशेखर कलगी खजिनदार रिजवान पटेल सहखजिनदार अर्जुन कणके दस्तगीर मुलांनी कार्यकारणी सदस्य राजाराम कांबळे तानाजी गावडे अमोल संकपाळ महंमदहनीफ शेख मायाप्पा पाणदारे शहाजान दानवाडे अमर उर्फ नाना कदम दत्तात्रय गावडे नासिर जमादार बाळेश्वर कोरे कुमार देसाई आयुबशाह जमादार आनंदा आंबुसकर राजू कोरे सुकुमार कोळी कामगार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून कामगार हित जोपासण्याचे अभिवचन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *