शेअर मार्केटमुळे संपलं कुटुंब, आधी लेकरांना विष पाजलं नंतर..,
शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे कमावण्याच्या नादात एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी पुण्यात घडली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे केशवनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेआहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये राहणाऱ्या थोटे कुटुंबातील चार जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवलं. दीपक पुंडलिक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि समीक्षा दीपक थोटे (वय 16 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. चौघांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
संबंधित कुटुंबीय मूळचे अमरावतीचे असून दोन महिन्यांपूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. मुलाचे वय 21 तर मुलीचे वय 17 होते. मागील काही दिवसांपासून संबंधित दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे पती पत्नी आर्थिक समस्याने मानसिक तणावाखाली होते. कौटुंबिक गरजा भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत होती.
त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी 21 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती- पत्नीने औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घटस्फोटानंतर तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवला होता. अखेर पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांच्या मध्यस्थीने मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यात आला. दिघी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे वृषभ मुकुंद जाधव ह्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. वृषभ मुकुंद जाधव याची त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी खटला सुरू होता.
घटस्फोटाचा निकाल वृषभ मुकुंद जाधव यांच्या विरोधात लागला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी येऊन त्याच्यावर दबाव टाकल्याने त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. ज्या पोलिसांनी वृषभवर दबाव टाकला त्या पोलीस कर्मचारी आणि त्याचे पूर्वीच्या पत्नीचे नातेवाईक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली होती. याप्रकरणी पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी दोघांची भूमिका समजून घेत मध्यस्थी केली आणि नातेवाईकांनी सदरील तरुणाचा मृतदेह दिघी पोलिस स्टेशनमधून स्ममशानभूमीकडे नेला. या प्रकरणी अधिक सखोल तपास दिघी पोलिस करत आहेत.